Pune Crime News : पोलिसांना माहिती दिल्याच्या कारणावरून एकास जीवे मारण्याचा प्रयत्न, कात्रज मधील घटना

एमपीसी न्यूज – पोलिसांना फोन करून माहिती दिल्याच्या कारणावरून एकास गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. संतोष नगर, कात्रज याठिकाणी शनिवारी (दि.03) रात्री साडे आठच्या सुमारास ही घटना घडली.

याप्रकरणी दत्ता जाधव (वय 44, रा. नवीन वसाहत गल्ली, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी पोलिसांना फोन करून माहिती दिल्याच्या कारणावरून त्यांना शिवीगाळ केली. तसेच, कोयत्याने वार केले व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे माराण्याचा प्रयत्न केला. असे फिर्यादीत म्हटले आहे‌.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.