Pune Crime News : पुण्यातील प्रसिद्ध मॉलमध्ये महिलेवर बलात्काराचा प्रयत्न

एमपीसी न्यूज -पुण्यातील नगर रस्त्यावरील एका प्रसिद्ध मॉलमध्ये काम करणाऱ्या महिलेवर स्वच्छतागृहात घुसून बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्यात आला (Pune Crime News) आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनिल उर्फ प्रकाश रामाप्पा कांबळे (वय 20) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 26 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे.

Pune Crime News : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेचा विनयभंग

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी या मॉलमध्ये हाउसकीपिंग म्हणून काम करतात. तर आरोपी देखील त्याच ठिकाणी कामाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तरुण पाठलाग करत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात का मॉलमध्ये सुनिल हा हाऊसकिंपींगचे कामे करतो. तो महिलेला ओळखतो. वेळोवेळी तो महिलाचा पाठलाग करत होता. त्याने दोन दिवसांपुर्वी महिला स्वच्छतागृहात गेल्यानंतर (Pune Crime News) अचानक आत घुसून अश्लील चाळे केले. तर, तिला शिवीगाळ करून मारहाण देखील केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.