Pune Crime News : पोलीस अधीक्षक कार्यालयात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप करीत एकाने काल संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयातच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेमुळे खळबळ उडाली असून आरोपीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नवनाथ थोरात असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सहायक पोलीस फौजदार मारूती शिंदे यांनी चतृःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नवनाथविरूद्ध मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यासंदर्भात नवनाथ काल दुपारी पोलीस अधीक्षक कार्यालयात गेला होता. त्यावेळी त्याने माझ्याविरूद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप करीत विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याठिकाणी खळबळ उडाली. कर्मचाऱ्यांनी तत्काळ नवनाथला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक संदीप पवार तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.