Pune Crime News : पार्कींगच्या वादातून बॅंक ऑफ बडाेदाच्या व्यवस्थापकास धक्काबुक्की

एमपीसीन्यूज : पार्कींगच्या वादातून बॅक ऑफ बडोदाच्या व्यवस्थापकाला धक्काबुक्की करत बँकेच्या कर्मचार्‍याला मारहाण करून त्यांच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चार जणांविरोधात लष्कर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चेतन पारेख, भुषण पटील, बिराजदार आणि एका सुरक्षा रक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विमोह रोशन मुद्रिका प्रसाद श्रीवास्तव (वय-42, रा. फुरसुंगी, पुणे) यांनी लष्कर पोलिस ठाण्यात आराेपी विराेधात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी श्रीवास्तव हे बँक ऑफ बडाेदाचे व्यवस्थापक असून पुणे-साेलापूर रस्त्यावर आईसलॅंड पार्क याठिकाणी त्यांची बॅंक आहे. तसेच जवळच अरिहंत काॅलेज आहे.

मागील काही दिवसांपासून अरिहंत कॉलेजच्या कर्मचार्‍यामध्ये वारंवार पार्कींगच्या वादातून बॅंक कर्मचाऱ्यांची भांडणे होत हाेती. याच कारणावरून शनिवारी सकाळी दहा वाजता त्यांच्या पुन्हा वाद झाल्याने श्रीवास्तव यांना धक्काबुक्की करण्यात आली.

तसेच बँकेचे कर्मचारी पांडुरंग गिड्डे यांना हाताने मारहाण करून त्यांच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर करण्यात आले.याप्रकरणी पाेलीसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला असून लष्कर पाेलीस ठाण्याचे पाेलीस उपनिरीक्षक एस. महाडिक याबाबत पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.