Pune Crime News : भवानी पेठेत तरुणाला मारहाण करून मोबाइल हिसकावला

एमपीसीन्यूज : सोसायटीच्या आवारात एकाला मारहाण करून चोरट्यांनी मोबाइल संच हिसकावल्याची घटना भवानी पेठ भागात घडली.

निलेश धायमुक्ते (वय 34, रा. सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी, भवानी पेठ) यांनी यासंदर्भात समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धायमुक्ते दोन दिवसांपूर्वी सकाळी साडेसहाच्या सुमारास सोसायटीच्या आवारात थांबले होते. त्यावेळी तिघेजण सोसायटीच्या आवारात आले.

धायमुक्ते यांना मारहाण करून तिघांनी त्यांच्याकडील मोबाइल संच हिसकावून नेला. चोरीला गेलेल्या मोबाइल संचाची किंमत 9 हजार रुपये असल्याचे धायमुक्ते यांनी तक्रारीत म्हटले आहे.

पोलीस उपनिरीक्षक प्रदीप पालांडे तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.