Pune Crime News : सराफा व्यापाऱ्याचा मित्राकडून विश्वासघात; दोन कोटींचे दागिने परत न करता केली फसवणूक

एमपीसी न्युज : पुण्यातील व्यावसायिकाचा मित्रांनीच विश्वासघात केल्याचे उघड झाले आहे. तब्बल दोन कोटी 20 लाख रुपयांचे दागिने परत न करता त्यांनी फसवणूक केली. फरासखाना पोलिस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी आनंद सुरेश गुंदेचा (वय 42) याला अटक करण्यात आली आहे.

सराफा व्यावसायिक देबू मजुमदार (वय 48) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी देबु मजूमदार यांचे बुधवार पेठेत सोन्या-चांदीचे दागिने विक्री करण्याचे दुकान आहे. ते कमी कॅरेटचा सोन्याच्या दागिन्यांची विक्री करतात. गुंडेशा त्यांच्याकडून हे दागिने घेऊन कोल्हापूर सांगली परिसरातील सराफ व्यवसायिकांना विकतात. या कामासाठी त्याला मजुमदार यांच्याकडून टक्केवारी मिळत होती.

नोव्हेंबर 2019 पासून गुंडेशा याने मजुमदार यांच्याकडून घेतलेले तब्बल दोन कोटी 20 लाखांच्या दागिन्याचा हिशोबच दिला नाही. दरम्यान राज्यात covid-19 प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाऊन जाहीर करण्यात आला त्यामुळे मजूमदार यांना इतरत्र प्रवास करता आला नाही.

परंतु,  या काळातही त्यांनी गुंदराज यांच्याशी संपर्क ठेवून दागिने परत मिळवण्यासाठी पाठपुरावा केला परंतु त्यांना अद्यापही दागिने परत मिळाले नाही.

दरम्यान दागिने परत मिळत नसल्याचे पाहून मजुमदार यांनी फरासखाना पोलिस स्टेशनमध्ये याप्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी उद्देशा याला त्याच्या कोल्हापूर येथील घरातून अटक केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक यशपाल सूर्यवंशी करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.