Pune crime News : भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

एमपीसी न्यूज – भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वारचा मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी (दि.21) सकाळी दहाच्या सुमारास खडकी येथील ऑर्डनन्स फॅक्टरीच्या मेनगेट समोरील रस्त्यावर घडली.

जयवंत चंद्रकांत विश्वकर्मा (वय 38, रा. गणेशनगर, बोपखेल, पुणे ) असे या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याप्रकरणी अरविंद कुमार विश्वकर्मा (वय 24, रा.गणेश नगर, बोपखेल, पुणे) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन आरोपी ट्रक चालक इशरत अब्रार हुसेन (वय 28, रा. कामाठी कॉलनी, नागपूर ) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अरविंद कुमार हे त्यांचे दाजी जयवंत चंद्रकांत विश्वकर्मा (मृत) यांच्यासोबत ॲक्टीव्हा मोपेडवरुन कामानिमीत्त जात होते.

त्यावेळी भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने दुचाकीला जोरदार ठोकर दिली. या अपघातात फिर्यादी अरविंद कुमार हे जखमी झाले तर, जयवंत चंद्रकांत विश्वकर्मा यांचा मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.