-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pune Crime News : दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भाजप नगरसेवकाच्या त्रासाला कंटाळून एकाची आत्महत्या

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आनंद रमेश रिठे यांच्या त्रासाला कंटाळून दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

संजय महादेव सुर्वे (वय 53) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी शशांक संजय सुर्वे (वय 26) यांनी फिर्याद दिली असून आनंद रिठे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत संजय सुर्वे यांच्या दत्तवाडी परिसरातील बिल्डींगच्या टेरेसवर रिलायन्स जिओ कंपनीचा नवीन टॉवर बसवला होता. हा टॉवर महानगरपालिकेकडून काढून न टाकण्याच्या बदल्यात आनंद रिठे यांनी संजय सुर्वे यांच्याकडे पैशाची मागणी केली होती. परंतु सुर्वे यांनी पैसे न दिल्याने रिठे यांनी पदाचा गैरवापर करून पुणे महापालिकेत अर्ज करून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा फौजफाटा आणून 10 जुन रोजी टेरेस वरील टॉवर काढून टाकला. त्यानंतर राहते घर देखील पाडून टाकणार आहे अशी धमकी देऊन रिठे यांनी फिर्यादी यांच्या वडिलांना मानसिक त्रास दिला.

त्यामुळे आनंद रिठे यांच्या वारंवारच्या त्रासाला कंटाळून, बिल्डिंग वरील टॉवर काढण्याचे मानहानी सहन न झाल्याने आणि घर पाडले जाणार या चिंतेने ग्रस्त असलेल्या संजय सुर्वे यांनी सोमवारी दत्तवाडी येथील एका दुकानात नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दत्तवाडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn