Pune Crime News : प्रशिक्षकाकडून बॉक्सर तरुणीचा विनयभंग, पुण्याच्या कोंढवा परिसरातील घटना

एमपीसी न्यूज – बॉक्सिंगचे प्रशिक्षण देणाऱ्या 28 वर्षीय तरुणाने 19 वर्षीय बॉक्सर तरुणीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोंढवा येथील लुल्लानगर चौकात असणाऱ्या एका सोसायटीत 19 मार्च रोजी हा प्रकार घडला. कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी रॉबिन सायमन अँथनी (वय 28, रा. लष्कर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ट्रेनरचे नाव आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी 19 वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी रॉबिन हा कोंढवा परिसरातील एका जिममध्ये ट्रेनर आहे. तर पीडित तरुणी या जिममध्ये व्यायामासाठी जात होती. यातूनच दोघांची ओळख झाली होती. पीडित तरुणीला बॉक्सिंग शिकायचे होते. आरोपीने मी बॉक्सिंग शिकवतो असे सांगितले. त्यानंतर बॉक्सिंग शिकवण्यासाठी तो पीडित मुलीच्या घरी येऊ लागला.

19 मार्च रोजी त्याने बॉक्सिंग शिकवत असताना तिला घाणेरडा स्पर्श केला. पीडितेने याला विरोध केला असता पाठलाग करून तिचा विनयभंग केला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.