Pune Crime News : बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत बिल्डरकडून कोट्यावधीची जमीन लाटली, महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – बांधकाम व्यावसायिकासोबत जवळीक साधून, त्याच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून त्याची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका महिलेसह तिघांना विरोधात फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महिला 56 गुंठे जमीन नावावर करून न दिल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत होती असे फिर्यादीत म्हटले आहे.

दीप्ती काळे (रा. बावधान), नीलेश शेलार (रा. कोथरूड), नितीन हमने यांच्यासह आणखी दोघांवर फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेने या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी, फिर्यादी यांच्या पतीचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे. येथील आरोपी दीप्ती काळे हिने फिर्यादीच्या पतीशी जवळीक साधली. त्यांच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच कन्स्ट्रक्शनच्या व्यवसायासाठी 35 लाख रुपये तिने फिर्यादीच्या पतीला दिले. त्याच्या बदल्यात तिने फिर्यादीच्या पतीकडून खेड तालुक्यातील कोयाळी येथील 100 गुंठे जमिनीपैकी 26 गुंठे आणि त्यानंतर 16 गुंठे अशी तीन कोटी रुपयांची 42 गुंठे जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली. तर उरलेली 58 गुंठे जमीन नावे करून देण्यासाठी तगादा लावला.

ही जमीन नावे करून नाही दिली तर फिर्यादीच्या नवऱ्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला जेलमध्येच आयुष्यभर सडवेल अशी धमकी दिली. तर इतर आरोपींनी फिर्यादी यांना मारहाण करत 58 गुंठे जमीन दिप्ती काळे हिच्या नावावर करून नाही दिली तर जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. फरासखाना पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.