Pune Crime News : मांजरी बुद्रूकमध्ये घरफोडी, 97 हजारांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील 23 हजारांच्या रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने मिळून 97 हजारांचा ऐवज चोरून नेला.

ही घटना दोन दिवसांपुर्वी सनराईज रेसीडन्सीमध्ये घडली. याप्रकरणी सुधाकर त्रिपाठी (वय ३०, रा. घुलेवस्ती, मांजरी, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सुधाकर कुटूंबियासह मांजरी-बुद्रूक परिसरातील घुले वस्तीवर राहायला आहेत. कामानिमित्त ते घराबाहेर गेले असता, चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडले. घरातील 23 हजारांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा मिळून 97 हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह शेळके तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.