Pune Crime News : घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद; 28 तोळे सोनं जप्त

एमपीसी न्यूज – घरफोडी करणा-या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने जेरबंद केले. त्याच्या जवळून 12.60 लाखांचे 28 तोळे सोनं जप्त करण्यात आले आहे.

जयवंत गोवर्धन गायकवाड (वय 32, रा. औंध) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपी जयवंत गायकवाड एक मोठी घरफोडी करुन सोलापुरला जाण्यासाठी हडपसर येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या भागात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

आरोपीने शिवाजीनगर परिसरात मोठी घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याच्या जवळून घरफोडीतील 12 लाख 60 हजार किंमतीचे 28 तोळे सोने जप्त करण्यात आले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.