Pune Crime News : घरफोड्याचे सत्र सुरूच, धनकवडी आणि विमाननगर परिसरातील फ्लॅट फोडून लाखोंचा ऐवज लंपास

एमपीसीन्यूज : मागील काही दिवसांपासून पुणे शहरात सातत्याने सुरू असणारे घरफोड्यांचे सत्र काही थांबण्याचे नाव घेत नाही. चोरट्यांनी आता घरांसोबत आपला मोर्चा दुकानाकडेही वळवला. चोरट्यांनी आता धनकवडी आणि विमान नगर परिसरातील बंद फ्लॅट फोडून लाखोंचा ऐवज लंपास केला आहे.

धनकवडी परिसरातील तळजाई ग्रीन सोसायटी मध्ये राहणारे राहुल ढमाले हे काही कामानिमित्त घराबाहेर गेले होते. त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या कडीकोयंडा उचकटून आत प्रवेश केला आणि कपाटातील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एक लाखाहून अधिक किमतीचा मुद्देमाल चोरून नेला.

_MPC_DIR_MPU_II

ढमाले यांनी याप्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी घटना विमान नगर परिसरात घडली असून चोरट्यांनी भावनगरी ड्रायफ्रूट नावाचे दुकान फोडले. दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश करताच चोरट्यांनी दुकानातील गल्ल्यातून 48 हजार रुपये चोरून नेले.

संजय पारेख यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस अधिक तपास करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.