Pune Crime News : घरफोडी, वाहनचोरी करणारे सराईत चोरटे जेरबंद

सहा घरफोडीचे, तीन वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस

एमपीसीन्यूज : पुणे शहरात विविध ठिकाणी घरफोडी व चोर्‍या करणार्‍या चार सराईत चोरट्यांना बिबवेवाडी पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले. त्याच्याकडील तपासात सहा घरफोडीचे आणि तीन वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.

सौरभ गोपाल कुमरेनी (21, रा. मांजरी खुर्द,पुणे), किरण काशीनाथ सुर्यवंशी (26, जयभीमनगर, दापोडी,पुणे), शुभम संतोष कांबळे (22, सोमेश्वरवाडी, पाषाण,पुणे मुळ रा. उस्मानाबाद) आणि प्रकाश विठ्ठल इरकन (22, रा. वडारवाडी,पुणे मुळ रा. विजापूर, कर्नाटक) अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत.

पोलीस त्यांच्याकडून तपासात बिबवेवाडी, वारजे, अलंकार आणि लोणीकंद पोलिस ठाण्यातील गुन्हे उघडकीस आले आहेत. यामध्ये तीन मोटारसायली, सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम, पितळाची पुजेची भांडी, साहित्य, मोबाईल हॅण्डसेट असा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

बिबवेवाडी पोलिस ठाण्याकडील तपास पथक हे बिबवेवाडी पोलिस ठाण्यातील कार्यक्षेत्रामध्ये 23 जानेवारीला पेट्रोलिंग करत असताना पोलिस अमंलदार तानाजी सागर यांना निलकमल सोसायटीकडे जाणाऱ्या रोडवर संशयीत चोरटे थांबले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली.

या तिघांनी त्यांचा साथीदार प्रकाश इरकन याच्या मदतीने बिबवेवाडी येथील दुकानाचे शेटर उचकटून दुकानातील काउंटरच्या ड्रावरमधून 50 हजार रूपये चोरून नेले होते. याप्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता.

दरम्यान, याप्रकरणी त्यांच्या साथीदाराला कर्नाटक येथून ताब्यात घेवून अटक करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.