Pune Crime News : आंध्रप्रदेशातून आणलेला गांजा निगडी येथे विक्रीसाठी घेऊन जाणा-यांना अटक, 24 लाखांचा मुद्देमाल जप्त 

एमपीसी न्यूज – आंध्रप्रदेशातून आणलेला गांजा निगडी येथे विक्रीसाठी घेऊन जाणा-या आरोपींना गुन्हे शाखेच्या पश्चिम विभाग अंमली विरोधी पथकाने आज अटक केली आहे. त्यांच्या कडून पाच प्लास्टिकच्या गोण्यातून 130 किलो 250 ग्रॅम वजनाचा गांजा असा तब्बल 24 लाख 54 हजार 930 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अरुण बळीराम जाधव ( वय 26, रा. भक्ती शक्ती चौकाजवळ, निगडी), प्रशांत हरीभाऊ शिंदे वय 25, रा.काळभोर गोठा,निगडी पुणे) व शुभम सुनिल मोहीते ( वय 19, रा. पांगरी ता.खेड जि.पुणे ) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी व अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस कर्मचारी प्रमोद गाडे यांना एका चारचाकी गाडीतुन गांजा वाहतुक होत असून ही कार येरवडा, शास्त्रीनगर चौकातून गोल्फ क्लब चौकाच्या दिशेने जाणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी शास्त्रीनगर चौकात सापळा रचला. यावेळी शास्त्रीनगर चौकाकडुन गोल्फ क्लब चौकाकडे भरधाव वेगाने जात असलेल्या संशयित कारला थांबण्याचा इशारा केला असता चालक गाडी न थांबविता तसाच पुढे निघून गेला. गाडीचा अधिक संशय आल्याने पाठलाग करुन थोडयाच अंतरावर गाडी पकडुन आरोपींना ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या आरोपी यांच्या कडून ताब्यातून पाच प्लास्टिकच्या गोण्यातून 130 किलो 250 ग्रॅम वजनाचा गांजा‌ असा एकूण 24 लाख 54 हजार 930 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. सदरचा गांजा आंध्रप्रदेश येथुन आणला होता व तो विक्रीकरीता निगडी येथे घेवुन जात असल्याचे आरोपींनी सांगीतले. गुन्हयाचा अधिक तपास पोलीस उप निरीक्षक दत्ताजी मोहीते करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.