Pune Crime News : बाईकची राईड न दिल्याच्या रागातून सराईताकडून तरुणाच्या कपाळावर सिगारेटचे चटके

एमपीसी न्यूज – स्पोर्ट्स बाईकची राईड न दिल्यामुळे एका सराईत गुन्हेगाराने 19 वर्षाच्या तरुणाच्या कपाळावर सिगारेटचे चटके दिले. पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात हा प्रकार घडला. सिंहगड रोड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटकही केली आहे.

योगेश देविदास कांबळे (वय 23) आणि अश्विन भोसले अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सुहास अभिमन्यू वाघमारे (वय 19) यांनी तक्रार दिली आहे. शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास वडगाव बुद्रुक परिसरात हा प्रकार घडला.

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हे फिर्यादीला आधीपासूनच ओळखत होते. घटनेच्या वेळी अभिमन्यू हा मित्रासह स्पोर्ट्स बाईकवरुन जात होता. त्याला आरोपींनी रोकडोबा मंदिराजवळ आवाज देऊन बोलावून घेतले आणि त्याच्याजवळ असलेल्या बाईकची एक राईड मागितली. पण अभिमन्यूने राईड देण्यास नकार दिला.

त्याचा राग आल्याने योगेश कांबळे याने अभिमन्यूला पकडले त्यानंतर दोन्ही आरोपींनी मिळून अभिमन्यूच्या कपाळावर सिगारेटचे चटके दिले. त्यानंतर आरोपी तेथून निघून गेले. दरम्यान फिर्यादीने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. यातील आरोपी कांबळे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1