Pune Crime News : कर्ज देण्याच्या बहाण्याने नागरिकांची फसवणूक; आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश

एमपीसी न्यूज – कर्ज देण्याच्या बहाण्याने नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा खडक पोलिसांनी पर्दाफाश केला. त्यांच्याकडून दोन अलिशान मोटारी, 4 मोबाईल असा मिळून 80 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

व्यवसायायाठी 25 कोटींचे कर्ज देण्याच्या आमिषाने मार्केटयार्ड परिसरातील माने टॅक्स अ‍ॅड बिझनेस कन्सल्टन्सीची 1 कोटी 52 लाख 45 हजारांची फसवणूक झाली होती. त्यानुसार खडक पोलिसांकडून गुन्ह्याचा तपास करण्यात येत होता.

व्ही. एम. महमंद दाउद खान (वय 28 रा. चेन्नई ) आणि आर कार्तिक रवीकुमार (वय ३२ रा. चेन्नई) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी खान आणि रवीकुमारला चैन्नईतून ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गाडे, सहायक पोलीस निरीक्षक यशपाल सुर्यवंशी, बंटी कांबळे, समीर माळवदकर, अमेय रसाळ, संदीप पाटील, राहूल मोरे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.