Pune Crime News : आंबेडकरनगर येथील सराईत गुन्हेगार शाहरुखवर पोलीस आयुक्तांकडून स्थानबद्धतेची कारवाई

एमपीसी न्यूज – मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबेडकर नगर येथील सराईत गुन्हेगार शाहरुख ऊर्फ चांग्या मेहबूब खान (वय 26) त्याच्यावर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली.

शाहरुख ऊर्फ चांग्या हा सराईत गुन्हेगार आहे. त्याने त्याच्या साथीदारांसह मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या हद्दीत तलवार, चॉपर, लाकडी बांबू यासारखी हत्यारे बाळगून जबरी चोरी घरफोडी दुखापत यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. मागील सहा वर्षाचा कालावधी त्याच्याविरोधात आठ गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच्या गुन्हेगारी स्वरूपाच्या कारवायांमुळे सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा निर्माण झाली होती. त्याच्या भीतीमुळे नागरिक उघडपणे तक्रारही करत नव्हते.

_MPC_DIR_MPU_II

त्याच्या या गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनघा देशपांडे आणि गुन्हे विभागाच्या पोलीस निरीक्षक सविता ढमढेरे यांनी एमपीडीए कायद्यानुसार शाहरुख ऊर्फ चांग्या याच्यावर कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार करून पोलीस आयुक्तांकडे सादर केला होता. त्यानुसार पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी या प्रस्तावाची पडताळणी करून 11 मे पासून त्याच्यावर एक वर्षापर्यंत स्थानबद्ध कारवाईचे आदेश पारित केले आहेत.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मागील सात महिन्यात गुन्हेगारी स्वरुपाची पार्श्वभूमी असणाऱ्या 20 जणांवर स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.