Pune Crime News : ‘मण्णपूरम गोल्ड’ शाखांमध्ये कर्जदार आणि कर्मचाऱ्यांचा गोंधळ !

एमपीसी न्यूज : सोन्याचे दागिने व कॉईन गहाण ठेवून अल्पव्याजदरात कर्ज देणारी ‘मण्णपूरम गोल्ड’ च्या पुण्यातील शाखांमधील कर्मचाऱ्यांनी थकित वेतनासाठी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. परिणामी लग्नसराई व अन्य कारणांसाठी कर्जदारांना कर्ज फेडून देखील त्यांचे दागिने परत न मिळाल्यामुळे शाखांमध्ये एकच गोंधळ केला.

स्वारगेट वेगा सेंटर नजिक असलेल्या मण्णपूरम गोल्डच्या शाखेत प्रचंड गर्दी झाली. या संदर्भात पुढील कारवाई करण्यासाठी घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झाले.

या प्रकरणी सविस्तर माहिती देताना स्वारगेट विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सर्जेराव बाबर म्हणाले, मण्णपूरम गोल्ड शाखांमधील कर्मचाऱ्यांचे वेतनाच्या मागणीसाठी कामबंद आंदोलन सुरू आहे. त्यामुळे त्या शाखेतील कर्जदारांना कर्ज फेडून देखील त्यांचे तारण ठेवलेले सोन्याचे दागिने परत मिळण्यास विलंब होत आहे. त्यामुळे आज ग्राहकांनी शाखेत गर्दी केली आहे. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.