Pune Crime News : चौथ्या मजल्यावरुन खाली पडल्याने बांधकाम कामगाराचा मृत्यू

एमपीसीन्यूज : इमारतीचे बांधकाम सुरू असताना पाय घसरून चौथ्या मजल्यावरून खाली कोसळल्यामुळे बांधकाम कामगारांचा मृत्यू झाला. विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सैनिक वसाहतीत हा प्रकार घडला.

मल्लेश बसप्पा चलवादी (वय 28) असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. या प्रकरणी एका ठेकेदाराविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक सारंग दळे यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, लोहगाव येथील सैनिक वसाहतीतील एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर मल्लेश चलवादी हा आरसीसीचे काम करत होता. लागली पाय घसरून खाली पडल्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने होता. 24 मे रोजी हा प्रकार घडला होता.

या प्रकरणातील कागदपत्रांचे अवलोकन करताना ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे मललेशचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. काम करून घेत असताना ठेकेदाराने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हेल्मेट, सुरक्षित जाळी इत्यादी साधनसामग्री पुरवली नाही. उघड्या डक्टवर योग्य ते झाकण न ठेवता हलगर्जीपणा केल्यामुळेच मल्लेश चलवादीचा मृत्यू झाला.

विमानतळ पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.