Pune Crime News : बांधकाम मजूर महिलेचा तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने मृत्यू; बिल्डर, सुपरवायझरसह ठेकेदारावर गुन्हा दाखल

एमपीसीन्यूज : बांधकाम साइटवर काम करीत असताना तिसऱ्या मजल्यावर विटा वाहून नेण्याचे काम असताना तिसऱ्या मजल्यावरून पाय घसरून पडल्याने एका बांधकाम मजूर महिलेचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी बिल्डर बिल्डिंगचा सुपरवायझर आणि ठेकेदार यांच्यासह इतर तिघांवर हलगर्जीपणा केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. वारजे पोलिस स्टेशनच्या हद्दीत एक नोव्हेंबर रोजी हा प्रकार घडला.

दौलवी हुसेन खललदार (वय 35) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शिवणे परिसरात इमारतीचे बांधकाम सुरू होते. मयत महिला दौलवी या इमारतीत विटा वाहून नेण्याचे काम करत होते. तिसऱ्या मजल्यावर काम करत असताना पाय घसरून खाली पडल्याने तिचा मृत्यू झाला.

संबंधित बिल्डर, ठेकेदार आणि सुपरवायझर यांनी मजुरांकडून काम करवून घेत असताना त्यांच्या जीविताच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना केल्या नाहीत.

हेल्मेट, सुरक्षित जाळी, सीट बेल्ट अशी उपकरणे पुरवली नाहीत तसेच उघड्या डक्टवर झाकण न ठेवता निष्काळजीपणा आणि हलगर्जीपणा केल्यामुळे दौलवी   या महिलेचा मृत्यू झाल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला.

अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक डमरे करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.