Pune Crime News : रुग्णालयातून पळून जाऊन कोरोनाबाधित महिलेची कॅनॉलमध्ये उडी मारुन आत्महत्या

एमपीसी न्यूज – एका खाजगी रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत असलेल्या 60 वर्षीय महिलेने रुग्णालयातून पळून जाऊन कॅनॉलमध्ये उडी मारुन आत्महत्या केली.

हडपसर परिसरातील एका कॅनॉलमध्ये या महिलेने आत्महत्या केली आहेस. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, .ज्या रुग्णालयात ती कोरोनाचे उपचार घेत होती त्या रुग्णालयातील तीन कोरोनाबधित रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे तिला गणेश पेठेतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु या रुग्णालयातून ही महिला अचानक बेपत्ता झाली होती. समर्थ पोलीस ठाण्यात या प्रकरणी मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली होती.

दरम्यान हडपसर येथील एका कॅनॉलमध्ये रविवारी सकाळी एका ज्येष्ठ महिलेचा मृतदेह आढळला. त्यानंतर समर्थ पोलिसांचे एक पथक घटनास्थळी गेले. कपडे व इतर वर्णन तिच्या कुटुंबातील सदस्यांना सांगितल्या प्रमाणे होते. त्यांनी तिची ओळख पटविली. संपूर्ण परिस्थितीवरून त्या महिलेने आत्महत्या केल्याचा संशय आहे. तिला आपल्यामुळे कुटुंबाला देखील लागण होईल, अशी भिती असावी, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ताम्हाणे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.