Pune Crime News : खासगी ट्रॅव्हल्समधून कुरियर बॉयची पाच लाखाची रोकड लंपास

एमपीसीन्यूज : खासगी कुरिअर सर्व्हिसमध्ये काम करणा-या कामगाराकडील ५ लाख ५० हजारांची रोकड असलेली बॅग चोरट्यांनी प्रवासादरम्यान चोरून नेली. ही घटना दोन दिवसांपूर्वी खासगी ट्रॅव्हल्स बसमध्ये घडली आहे.

याप्रकरणी मयूर विठ्ठल मुळीक (वय २४, रा. नगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयूर एका खासगी कुरिअर सर्व्हिस कंपनीत कामाला आहे. ९ डिसेंबरला ते नगर ते पुणे असा आरामदायी बसने प्रवास करीत होते. त्यावेळी त्यांच्याकडे कुरिअर सर्व्हिसची जमा झालेली ५ लाख ५० हजार रूपयांची रोकड होती.

प्रवासादरम्यान त्यांना झोप आल्यामुळे मयूरने बॅग डोक्याखाली ठेवली होती. नेमकी तीच संधी साधून चोरट्यांनी त्यांच्याकडील ५ लाख ५० हजारांची रोकड असलेली बॅग चोरून नेली आहे.

याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रताप गिरी तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.