Pune Crime News : लग्नाच्या पहिल्याच दिवशी नवरीवर गुन्हा; गाडीच्या बोनेटवर बसून केले होते फोटोशूट

एमपीसीन्यूज : लग्नाच्या दिवशी मंगल कार्यालयात जाताना चारचाकी गाडीच्या बोनेटवर बसून फोटो, व्हिडीओ काढणे एका नवरीला चांगलेच महागात पडले. वाहतुकीच्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी आणि कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नवरी, गाडीचा चालक, व्हिडीओग्राफर आणि इतर नातेवाईकांवर लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

२३ वर्षीय नवरी, स्कॉर्पिओचा चालक गणेश शामराव लवांडे (वय 38), व्हिडिओ ग्राफर तुकाराम सौदागर शेंडगे (वय 23) आणि गाडीतील इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादवि कलम 269, 188, 269, 107, 336, 34, आपत्ती व्यवस्थापन कायदा व महाराष्ट्र कोविड उपाययोजना या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

ही नवरी पिंपरी चिंचवडच्या भोसरीतील आहे. सासवडमध्ये आज तिचे लग्न होते. दिवे घाटातून जात असताना या नवरीचा स्कॉर्पिओ गाडीच्या बोनेटवर बसलेला व्हिडीओ व्हायरल झाला होता. व्हिडीओग्राफर व्हिडीओ चित्रित करताना व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत होते.

दरम्यान व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोणी काळभोर पोलिसांनी याची गंभीर दखल घेत नवरी आणि तिच्या नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.