Pune Crime News : सराईत शिकलगरी गुन्हेगारांना अटक, 3.20 लाखाचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – सराईत शिकलगरी गुन्हेगारांना अटक करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट 3 पथकाला यश आले आहे. शिवणे, पुणे येथून शनिवारी (दि.18) त्यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून 3.20 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

लकीसिंग गब्बरसिंग टाक (रा. दौंड, पुणे) आणि हरजीतसिंग शिसपालसिंग टाक (रा. उत्तर सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे शिवणे, पुणे येथून शनिवारी (दि.18) त्यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीअंती आरोपींनी केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून 3 लाख 29 हजार 265 रूपयांचे सोने-चांदीचे दागिने, कार तसेच घरफोडीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.