Pune crime news : आमच्या गॅंगच्या नादाला लागतो का, म्हणत अल्पवयीन तरुणावर रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा जीवघेणा हल्ला

एमपीसी न्यूज- आमच्या गॅंगच्या नादाला का लागतो , असे म्हणत पाच जणांच्या टोळक्याने एका अल्पवयीन मुलावर प्राणघातक(Pune News) हल्ला केला. येरवड्यातील लक्ष्मी नगर येथील संतोष मित्र मंडळाजवळ शनिवारी रात्री हा प्रकार घडला. हल्ला करणारे सर्व आरोपी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. यातील तीन आरोपी हे अल्पवयीन आहेत. 
शरद प्रमोद इंगळे (वय 27) आणि विवेक प्रकाश गवळी (वय 20) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. तर 16 आणि 17 वर्ष वयाच्या तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. 17 वर्षीय अल्पवयीन तरुणाने या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. फिर्यादी हे शनिवारी रात्री जेवण करून फिरत असताना आरोपींनी त्यांच्या हातात लोखंडी पहार व काचेच्या बाटल्या घेऊन फिर्यादी यांच्यावर हल्ला केला. आमच्या गॅंगच्या मुलांच्या नादाला का लागतो? अब्दुल्लाला का मारले? आज तुला चांगलीच अद्दल घडवतो, असे म्हणून आरोपी शरद इंगळे यांनी लोखंडी पहारेने त्याला मारहाण केली. तर इतर आरोपींनी हातातील काचेच्या बाटल्या आणि दगड रस्त्यावर फेकून परिसरात दहशत निर्माण केली. येरवडा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा (Pune News) दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.