Pune Crime News : फेसबुकवर करुणा शर्मा, धनंजय मुंडे यांचे फोटो टाकून बदनामी, पुण्यात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – राज्य मंत्री धनंजय मुंडे आणि सामाजिक कार्यकर्त्या करुणा शर्मा यांच्या नावाचा संदर्भ देऊन, बदनामीकारक फोटो टाकून व प्रक्षोभक वक्तव्याची पोस्ट टाकून त्यांची बदनामी करणाऱ्या एका व्यक्तीच्या विरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल मुळे असे नाव असलेल्या एका फेसबुक वापरकर्त्याविरोधात शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी ज्ञानेश्वर बडे यांनी फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, 19 एप्रिल 2019 पासून हा प्रकार सुरू होता. आरोपी राहुल मुळे या फेसबुक वापरकर्त्याने त्याच्या अकाउंट वरून घाणेरड्या व अश्लील भाषेमध्ये पोस्ट केल्या. त्याच्या काही फेसबुक पोस्टमध्ये मराठा समाजातील लोकांच्या भावना दुखवून समाजात कटुता निर्माण होईल, अशा प्रकारच्या पोस्ट लिहिल्या आहेत.

या सर्व प्रकारानंतर शिवाजीनगर पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे अधिक तपास करीत आहेत.

 

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.