Pune Crime News : खंडणी मागणाऱ्या दोघांना तीन लाख स्वीकारताना अटक

खंडणी विरोधी पथकाची कारवाई

एमपीसी न्यूज – मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन क्रिकेट, फुटबॉल, टेनिस, कसिनो इत्यादी गेमवर बेटींग करत 30 हजार पॉईंट जमा झाल्याचे सांगितले. त्याबदल्यात 30 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोघांना 3 लाख स्वीकारताना खंडणी विरोधी पथकाने रंगेहात पकडले.

अमोल रमाकांत एकबोटे (वय 29, रा. बाणेर, पुणे) व सौरभ पांडुरंग माने (वय 25, रा. बाणेर, पुणे) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमोल एकबोटे याने फिर्यादीच्या मोबाईल वरून लोटस मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन क्रिकेट, फुटबॉल, टेनिस, कसिनो इत्यादी गेमवर बेटींग करत 30 हजार पॉईंट जमा झाल्याचे सांगितले. त्याबदल्यात फिर्यादी यांच्याकडे 30 लाख रुपयांची मागणी केली.

_MPC_DIR_MPU_II

फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांना अमोल एकबोटे, सौरभ माने, आदित्य वर्मा, ओंकार व दया लांडगे यांनी शिवीगाळ करत धमकी दिली. तसेच त्यांना जबरदस्तीने त्यांची चारचाकी (एम एच 12 क्यु एफ 7156) यातून खेड शिवापुर येथे घेऊन गेले.

आरोपी अमोल एकबोटे याने फिर्यादी यांचा मोबाईल हिसकावुन घेतला व व्हॉटसॲपवरुन फिर्यादी यांच्या पॅनकार्डचा फोटो दर आठवड्याला 3 ते 4 लाख रुपये देणे आहे, असा मेसेज टाईप करुन स्वतःला पाठवला.

फिर्यादीला कात्रज चौकात सोडून दिले. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार सोमवारी (दि.05) तीन लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले.

हि कामगिरी अपर पोलीस आयुक्त, गुन्हे अशोक मोराळे, पोलीस उपआयुक्त, गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहा. पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, पोलीस अंमलदार प्रदीप शितोळे, विनोद साळुंके. शैलेश सूर्य, सुरेंद्र जगदाळे, संग्राम शिनगारे, प्रविण पडवळ, संपत औचरे, प्रदिप गाडे, अमोल पिलाने, चेतन शिरोळकर, महीला पोलीस रुपाली कर्णवर, आशा कोळेकर यांनी केली

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.