Pune Crime News : आत्महत्या करण्याची धमकी देत अल्पवयीन तरुणीला प्रेमाची मागणी, तरुणाविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – 21 वर्षीय तरुणाने अल्पवयीन तरुणीला सोशल मीडियाच्या माध्यमातून वारंवार प्रेमाची मागणी घालत आत्महत्या करण्याची धमकी दिली. याशिवाय तिच्या इच्छेविरुद्ध स्पर्श करीत विनयभंग केला. लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला.

पोलिसांनी याप्रकरणी पुष्कर कोतवाल (वय 20) या तरुणावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पीडित मुलीच्या वडिलांनी तक्रार दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. पीडित अल्पवयीन मुलगी त्याच्या ओळखीतली आहे. तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने तिला अनेक वेळा आय लव यु असे मेसेज पाठवले होते. सोशल मीडियाच्या माध्यमातूनच तो तिला आत्महत्या करण्याची धमकी देत होता. तिचा पाठलाग करून पीडित मुलीला स्पर्श करण्याचा देखील त्याने अनेकदा प्रयत्न केला.

दरम्यान त्याच्याकडून वारंवार होणाऱ्या या कृत्याला कंटाळून पीडित मुलीने लोणी काळभोर पोलीस स्टेशन गाठत त्याच्या विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.