Pune Crime News: उधार घेतलेल्या फटाक्यांच्या पैशांवरून वाद, एकाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – दिवाळीच्या कालावधीत उधारीवर घेतलेल्या फटाक्यांचे पैशावरून वाद झाल्यानंतर दोघांनी एकाला बेदम मारहाण केली. समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घडली. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

आकाश दशरथ गाडे (वय 27) व संदीप किसन आसवरे (वय 34, रा. भवानी पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सचिन शेलार (वय 32) यांनी तक्रार दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, तक्रारदाराने सचिन व त्यांच्या एक मित्र हरीष पंचमुख यांनी भागीदारीत फटाक्यांचा स्टॉल टाकला होता. आकाश गाडे हा सचिन यांच्या ओळखीतील आहे. आकाश याच्या दुसऱ्या एका मित्राने सचिन यांच्याकडून उधारीवर फटाके घेतले होते. परंतु, त्याने पैसे दिले नव्हते.

काही दिवस झाल्यानंतर तक्रारदार सचिन हे सोमवारी आकाश याच्याकडे पैशांसाठी गेले. त्याने जाब विचारला असता यावेळी दोघांमध्ये वादावादी झाली. त्यावेळी आकाश व संदीप या दोघांनी हाताने मारहाण करत सुरीने हातावर वार केले.

समर्थ पोलीसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.