Pune Crime News : चालकाचे नियंत्रण सुटल्याने मोटारीचा अपघात; बोपदेव घाटातील अपघातात तरुण ठार, चार जखमी

एमपीसी न्यूज – चालकाचे नियंत्रण सुटल्याने मोटार पलटी होउन झालेल्या अपघातात तरुण ठार झाला असून चार जण जखमी झाले आहेत. हा अपघात काल रात्री पावणेबाराच्या सुमारास बोपदेव घाटात घडला. कोंढवा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत जखमींना रुग्णालयात दाखल केले.

_MPC_DIR_MPU_II

कृष्णकांत नंदकुमार कळसे (वय 25, रा. येवलेवाडी टिळेकरनगर) असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे. योगेश परिहार, चैतन्य गणेश गांधी, प्रथमेश टकले अशी जखमी झालेल्याची नावे आहेत. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री सव्वा अकराच्या सुमारास पाच मित्र मोटारीतून सासवड येथून पुण्यात येत होते. मध्यरात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास बोपदेव घाटातील उतारावर चालकाने मोटारीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे मोटार पलटी झाल्यामुळे कृष्णकांत कळसे यांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर चौघे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक चैत्राली गपाट आणि रात्र गस्तीवर असलेल्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. अपघातात मोटारीचा चुराडा झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.