Pune Crime News : कोट्यवधी रुपयांचे जप्त अंमली पदार्थ भारत फोर्जच्या भट्टीत नष्ट

एमपीसी न्यूज – पुणे आयुक्तालयाच्या हद्दीतील 28 पोलीस ठाण्यात 156 गुन्ह्यातील जप्त केलेले कोट्यवधी रुपयांचे अंमली पदार्थ भारत फोर्जच्या भट्टीत जाळून नष्ट करण्यात आले. मंगळवारी (दि.23) सायंकाळी पाच वाजता या अंमली पदार्थांची विल्हेवाट लावण्यात आली.

सुमारे साडेचार कोटी किंमतीचे हे अंमली पदार्थ असल्याचे पोलिसांनी सांगितले. यामध्ये 335 किलो गांजा, 400 ग्रॅम चरस, 128 ग्रॅम मेफेड्रॉन, 4 किलो ब्राऊन शुगर, एक किलो कोकेन, 77 मिली एमफेटामाईन, 361 ग्रॅम मॅथेक्युलोन या अंमली पदार्थांचा समावेश होता. पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता व उपायुक्त रवींद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

मंगळवारी (दि.23) सायंकाळी पाच वाजता मुंढवा येथील भारत फोर्जच्या भट्टीत संपूर्ण प्रक्रियेचं पालन करुन अंमली पदार्थांची विल्हेवाट लावण्यात आली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.