Pune Crime News : जादा परताव्याच्या आमिषाने ज्येष्ठाची 11 लाख रुपयांनी फसवणूक

एमपीसीन्यूज : ज्येष्ठ नागरिकाला शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत तब्बल 11 लाख 20 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. एका ज्येष्ठ नागरिकाने याप्रकरणी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी तक्रारदार व्यक्तीच्या मोबाईलवर अज्ञात इसमाने संपर्क साधला होता. त्याने एक्सलेंसा ऑप्शन ऑनलाइन ट्रेंडिग कंपनीकडून शेअर बाजारात गुंतवणूक करण्यात येते. गुंतवणुक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष त्यांना दाखविले होते. त्यानंतर त्यांना मोबाईलवर मेसेज पाठवत तब्बल 35 लाख रुपये परतावा देण्याचे आमिष दाखवले.

तक्रारदार व्यक्तीने या आमिषाला बळी पडत ऑनलाइन पद्धतीने वेळोवेळी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांना काही प्रमाणात परतावा देखील देण्यात आला. दरम्यान परताव्याची रक्कम मिळत असल्यामुळे सदर व्यक्तीने वेळोवेळी 11 लाख 21 हजार 434 रुपये संबंधित व्यक्तीच्या खात्यावर पाठवले.

मात्र, त्यानंतर त्यांना परताव्याची रक्कम मिळणे बंद झाले. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक उल्हास कदम तपास करत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.