Pune Crime News : शेजाऱ्याकडून ज्येष्ठ महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज – पाषाण परिसरात शेजारी राहणाऱ्या ( Pune Crime News ) इसमाने 75 वर्षीय महिलेचा  विनयभंग करत तिला शिवीगाळ करुन धक्काबुक्की केल्याची घटना घडली. याप्रकरणी आदर्श डोग्रा (रा. पुणे) या आरोपीवर चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Today’s Horoscope 10 March 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

ही घटना तीन जानेवारी रोजी घडली. पीडित महिला आणि आरोपी हे एकमेकांचे शेजारी आहेत. घटनेच्या दिवशी आरोपीने विनाकारण महिलेच्या सेफ्टी ग्रील डोअरवर लाथा मारल्याने त्यांनी याबाबत शेजाऱ्याकडे विचारणा केली. त्यावेळी आरोपीने आक्रमकपणे व निर्लज्जपणे महिलेशी धक्काबुक्की करून तिला शिवीगाळ केली. त्यांचा हात पिरगाळून त्यांचे अंगाशी झटापट करून त्यांचा विनयभंग केला. याप्रकरणी चतुश्रृंगी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस भालेराव पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.