Pune Crime News: उद्योजक गौतम पाषाणकर कोल्हापुरात? तपासासाठी पोलिसांचे पथके रवाना

एमपीसी न्यूज – पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकर यांना बेपत्ता होऊन दोन आठवडे उलटले आहेत. त्याबाबत पुणे पोलिसांना तपासात काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आहेत. काही दिवसांपूर्वी पाषाणकर कोल्हापूरमध्ये एका हॉटेलमध्ये दिसून आले होते.  त्यानंतर त्यांचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

गौतम पाषाणकर हे 21 ऑक्टोबरपासून पुढील शहरातून बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांनी सहा वेगवेगळी पथके स्थापन केली आहे. आतापर्यंत राज्यातील कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या भागात पोलीस त्याच्या शोधार्थ जाऊन आले आहेत.

पाषाणकर कोल्हापुरातील एका हॉटेलात वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे  चित्रीकरण  पडताळले.  सीसीटीव्ही चित्रीकरण कुटुंबीयांनी त्यांना पाहिले असून त्यांनीही दुजोरा दिला आहे.  त्यांच्या शोधासाठी  रत्नागिरी, कणकवली, गणपती पुळे येथे पथके रवाना करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.