_MPC_DIR_MPU_III

Pune Crime News : उद्योजक गौतम पाषाणकर बेपत्ता प्रकरणात पोलिसांकडे धागेदोरे, येत्या काही दिवसात गूढ उकलेल

एमपीसीन्यूज : उद्याोजक गौतम पाषाणकर बेपत्ता होऊन दोन आठवडे उलटले असतानाच पोलिसांना तपासात काही महत्वाचे धागेदोरे मिळाले आहेत. पाषाणकर यांच्या बेपत्ता होण्यामागचे गूढ येत्या काही दिवसात उकलेल, अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.

_MPC_DIR_MPU_IV

पाषाणकर बेपत्ता झाल्यानंतर त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पथके तयार करण्यात आली. या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू असून पोलिसांना काही धागेदोरे मिळाले आहेत. आठवडभरात पाषाणकर बेपत्ता होण्यामागचे गूढ पोलिसांना उकलेल, असे पोलीस आयुक्त गुप्ता यांनी नमूद केले.

_MPC_DIR_MPU_II

लोणीकाळभोर, लोणीकंद पोलीस ठाण्यांचा समावेश पुणे पोलीस आयुक्तालयात करण्यात आला आहे. या दोन्ही पोलीस ठाण्यांचा समावेश आयुक्तालयात करण्यात आल्यानंतर तेथील मनुष्यबळ तसेच पायाभूत सुविधांबाबत पालकमंत्री अजित पवार यांच्याबरोबर चर्चा करण्यात येणार आहे.

चतु:शृंगी आणि हडपसर पोलीस ठाण्याचे विभाजन करून तेथे आणखी दोन नवीन पोलीस ठाणी निर्माण करण्याबाबत गृहविभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहरात एका वाहतूक पोलिसाच्या अंगावर मोटार घालण्यात आली. पोलिसांवर होणारे हल्ले तसेच गैरवर्तणुकीचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. असे कृत्य करणा-यां विरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.