_MPC_DIR_MPU_III

Pune Crime News : मैत्रिणींसोबत ‘लाँग ड्राईव्ह’वर जाण्यासाठी महागड्या बाईक चोरणारा जेरबंद

एमपीसी न्यूज – मैत्रिणीचे लाड पुरवण्यासाठी आणि त्यांच्यासोबत लाँग ड्राईव्हवर जाण्यासाठी महागड्या दुचाकी चोरणाऱ्या एका चोरट्याला दत्तवाडी पोलिसांनी जेरबंद केले. त्याने चोरलेल्या पाच दुचाकीही पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

_MPC_DIR_MPU_IV

सौरभ दत्तात्रय चोरगे (वय 20) असे या चोरट्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. लॉकडाऊनच्या आधी तो एका कपड्याच्या दुकानात तो काम करत होता. परंतु, लॉकडाऊनमध्ये त्याची नोकरी गेली.

_MPC_DIR_MPU_II

दरम्यान त्याला अनेक मैत्रिणी होत्या. या मैत्रिणीवर छाप पाडण्यासाठी आणि त्यांना फिरायला घेऊन जाण्यासाठी त्याने दुचाकी चोरी करण्यास सुरुवात केली. अशाप्रकारे त्याने पाच दुचाकी चोरीला होत्या.

दरम्यान, दत्तवाडी पोलिस स्टेशनचे हवालदार कुंदन शिंदे यांना खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार एक चोरटा चोरीची दुचाकी घेऊन वसंतराव बागुल उद्यानाच्या परिसरात थांबला असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार दत्तवाडी पोलिसांच्या कर्मचाऱ्यांनी त्याला ताब्यात घेऊन दुचाकीविषयी विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

परंतु, पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्याने दुचाकी चोरीची असल्याचे कबुली दिली. त्याच्याकडे केलेल्या सखोल चौकशीत त्याने दत्तवाडी व भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीततुन पाच दुचाकी चोरल्याची कबुली दिली.

 

 

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.