-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pune Crime News : फेसबुकवरील मैत्री पडली महागात, गिफ्टच्या बहाण्याने 18 लाखांची फसवणूक

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – फेसबुकवर झालेल्या मैत्रीतून एका महिलेची अठरा लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गिफ्ट पाठवल्याच्या बहाण्याने कस्टम ड्युटीसाठी हे पैसे बॅंक खात्यात जमा करून घेतले आहेत. 3 डिसेंबर 2020 ते 18 जानेवारी 2021 या कालावधीत वानवडी परिसरात हा प्रकार घडला.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

याप्रकरणी 47 वर्षीय महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार Droscar Santiago या नावाच्या फेसबुक धारकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.‌

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेला आरोपीने फेसबुकवर फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठवली आरोपीने फिर्यादी यांच्या सोबत ओळख वाढवून गिफ्ट पाठवले असून त्यामध्ये पैसे असल्याचे सांगितले. गिफ्ट सोडवण्यासाठी कस्टम ड्युटी भरावी लागेल असे सांगून त्यापोटी 18 लाख 12 हजार रुपये बॅंक खात्यात जमा करून घेतले व महिलेची फसवणूक केली.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.