Pune Crime News : ‘स्पा’ चालू ठेवण्यासाठी खंडणी उकळणारे तोतया पत्रकार जेरबंद

एमपीसी न्यूज – ‘स्पा’ व्यवसाय चालू ठेवण्यासाठी स्पा मालकाकडून पंधरा हजार रुपयांची खंडणी उकळणाऱ्या तीन तोतया पत्रकारांना कोरेगाव पार्क पोलिसांनी जेरबंद केले.

याप्रकरणी कोरेगाव पार्क परिसरातील स्पा मॅनेजरने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार विशाल पायाल, सन्नी ताकपेरे व पंकज जाधव यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

याप्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, कोरेगाव पार्क परिसरात फिर्यादी यांचे स्पा सेंटर आहे. ते स्पा सुरू ठेवण्यासाठी तसेच त्याबाबत बातमी न लावण्यासाठी वरील तीन तोतया पत्रकारांनी त्यांच्याकडे 15 हजार रुपयांची खंडणी मागितली होती. तसेच दर महिन्याला ते 15 हजार रुपये मागत होते. याबाबत त्यांनी कोरेगाव पार्क पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार आज पोलिसांनी या तिघांना खंडणी प्रकरणात ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

ही कारवाई सहाय्यक निरीक्षक नरेंद्र पाटील यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.