Pune Crime News : पुणे पोलीस आयुक्तालयाच्या गेटवरूनच तोतया पोलिसाला अटक

एमपीसी न्यूज –  पुणे पोलीस आयुक्तालयाच्या गेटवर उभा राहून एका पोलीस कर्मचाऱ्यालाच बदलीसाठी ऑफर देणाऱ्या तोतया पोलीसाला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा एकच्या पथकाने (Pune Crime News) अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी (21 जानेवारी) करण्यात आली.

अमित जगन्नाथ कांबळे (वय 35) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.याप्रकऱणी पोलीस कर्मचारी रुस्तुम मुजावर (वय 47) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

Pune Crime News : हप्ता दिला नाही म्हणून कोथरुड येथे किराणा दुकानदारावार चाकुने वार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांबळे याने फिर्यादीला फोन करून मी पोलीस निरीक्षक बोलत असून तुमची अगर तुमच्या ओळखीच्यांची बदली करायची आहे का अशी विचारणा केली. फिर्यादी यांना त्याचा संशय आला. त्यांनी  संभाषण पुढे वाढवले असता  कांबळेने त्यासाठी पैशांची मागणी केली.

त्याने पुन्हा फिर्यादींना फोन करून पुणे आयुक्तालयाच्या गेटवर वाट बघत असल्याचे फोन करून सांगितले. त्यांनतर फिर्यादी यांनी गुन्हे शाखा युनीट एकच्या पथकाला याबाबत माहिती दिली. पथक तेथे पोहचले त्यांनी कांबळेकडे सखोल चौकशी केली असता तो तोतया असल्याचे पोलीस तापासात उघड झाले.त्याच्यावर बंड गार्डन पोलीस (Pune Crime News)ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.