Pune Crime News : तेरा वर्षीय मुलाकडून रागाच्या भरात वडिलांचा खून

एमपीसी न्यूज – पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जांभुळवाडी परिसरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलाने रागाच्या भरात स्वतःच्या वडिलांचा चाकू भोसकून खून केला. गुरुवारी ही घटना घडली. भारती विद्यापीठ पोलिसांनी या मुलाला ताब्यात घेतले आहे.

दस्तगीर (वय 38) असे खून झालेल्या वडिलांचे नाव आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सूरु आहे.

या प्रकरणी मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, मृत दस्तगीर हे सुरक्षा रक्षकाचे काम करतात. त्यांच्या मुलात आणि मुलीमध्ये काही कारणावरून भांडण झाले होते. याच कारणावरून दस्तगीर यांनी या मुलाला हाताने मारहाण केली होती. याच रागातून संबंधित मुलाने घरातील चाकूने वडिलांच्या पोटावर वार केले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने दस्तगीर यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांसह काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सायंकाळ पर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.