Pune Crime News : हडपसर परिसरात विक्रीसाठी आणलेला पन्नास किलो गांजा जप्त, तरुण अटकेत

एमपीसी न्यूज – पुण्यातील हडपसर परिसरातून अमली पदार्थ विरोधी पथकाच्या कर्मचाऱ्यांनी 10 लाख रुपये किमतीचा तब्बल 50 किलो गांजा जप्त केला. एका बोलेरो पिकप गाडीतून हा गांजा विक्रीसाठी आणला होता. पोलिसांनी यावेळी अण्णा मोहन जाधव (वय 26 वर्षे रा कोलवाडी ता.हवेली पुणे) या तरुणाला अटक केली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की अमली पदार्थ विरोधी पथकाचे कर्मचारी हडपसर परिसरात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना स्मशानभूमी जवळील एका रस्त्यावर संशयास्पद अवस्थेत एक बोलेरो पिकप गाडी दिसली. त्यांनी गाडीची झडती घेतली असता 50 किलो गांजा त्यांना आढळला. त्यानंतर पोलिसांनी बोलेरो चालक अण्णा जाधव याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याचा भाऊ सागर जाधव याने हा गांजा विक्री करण्यासाठी दिला असल्याचे सांगितले.

त्यानंतर पोलिसांनी आरोपी अण्णा जाधव याला अटक केली. या दोन्ही भावांविरोधात NDPS Act कलम 8(क ),20ब 2(क ) प्रमाणे हडपसर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी जवळील 50 किलो 503 ग्राम गांजा, ज्याची किंमत दहा लाख रुपये, रोख 2000, आणि बोलेरो पिकप गाडी असा एकूण 18 लाख 12 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अधिक तपास गुन्हे शाखेचे पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.