Pune Crime News : सहायक आयुक्तांच्या कार्यालयात कचरा टाकणाऱ्या मनसे नगरसेवकावर गुन्हा दाखल

एमपीसीन्यूज : वानवडी कोंढवा विभागाच्या सहाय्यक महापालिका आयुक्त किशोरी शिंदे यांच्या कार्यालयामध्ये मनसैनिकांनी कचरा टाकल्याप्रकरणी मनसे नगरसेवक साईनाथ बाबर यांच्याह महाराष्ट्र सैनिकांविरोधात वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घनकचरा विभागाच्या वतीने हडपसर, कोंढवा, रामटेकडी आणि वानवडी परिसरातील कचरा वेळेवर न उचलला जात असल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी वानवडी कोंढवा विभागाच्या सहाय्यक महापालिका आयुक्त किशोरी शिंदे यांच्या कार्यालयामध्ये मनसैनिकांनी कचरा टाकला होता. नगरसेवक साईनाथ बाबर यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले.

याप्रकरणी आता मनसेचे नगरसेवक साईनाथ बाबर यांच्यासह मनसैनिकांविरोधात वानवडी पोलिसानी गुन्हा दाखल केला. नगरसेवक बाबर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तोंडाला मास्क न लावणे, सोशल डिस्टंसिंगचे नियम न पाळल्याने आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहाय्यक आयुक्त किशोरी शिंदे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

कोंढवा वानवडी रामटेकडी हडपसर या भागातील कचरा दररोज उचलला जात नाही. त्यामुळे या परिसरात जागोजागी कचऱ्याचे ढीग साचतात. त्यामुळे याचा निषेध करण्यासाठी सोमवारी दुपारी बारा वाजता मनसेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले होते.

मनसेच्या दहा ते बारा कार्यकर्त्यांनी सोबत आणलेला ओला सुका व कुजलेला कचरा कार्यालयात अनेक कार्यालयातील संपूर्ण लॉबीमध्ये टाकला होता. तसेच कार्यालयातील इतर सहकाऱ्यांच्या टेबलावर हा कचरा टाकून सरकारी कामात अडथळा आणला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.