Pune Crime News :  महिलेचा पाठलाग करून त्रास देणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल 

एमपीसीन्यूज  :  एका 36 वर्षीय महिलेचा पाठलाग करून तिला त्रास देणार्‍या 29 वर्षीय  तरुणाविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला. 

ऋषिकेश नितीन पवार (वय 29) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी एका 36 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

आरोपीने या महिलेच्या फेसबुक आणि इंस्टाग्रामचे पासवर्ड चोरून तिच्या मित्र-मैत्रिणींना त्रास दिल्याचे समोर आले आहे. शिवाजीनगर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली आहे.

फिर्यादी महिला ज्या ठिकाणी जात असे त्या ठिकाणी आरोपी तरुण तिचा पाठलाग करून तिला त्रास देत असे. या सर्व प्रकाराला   तक्रारदार महिला वैतागली होती. या सर्व प्रकाराची माहिती तिने कुटुंबीयांना दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशन गाठत संबंधित तरुणाविरोधात तक्रार दिली.

शिवाजीनगर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III