Pune Crime News : जळगावातील बीएचआर पतसंस्थेच्या अवसायकावर आर्थिक गुन्हे शाखेची धाड

एमपीसी न्यूज : राज्यभरातील मल्टी-स्टेट पतसंस्था असलेल्या बी.एच.आर. (भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्था) अवसायक जितेंद्र कंडारे यांच्या शिवाजीनगरातील निवासस्थानी व प्रसिद्ध व्यावसायीक सुनिल झंवर यांच्याही निवासस्थानी आज, शुक्रवारी पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकांनी छापे टाकले.

या दोघांचीही सध्या चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

पुणे पोलिस, पिंपरी चिंचवड पोलीस व पुणे ग्रामीण पोलीस यांच्या संयुक्त पथकाद्वारे ही कार्यवाही सुरू आहे. बीएचआर पतसंस्थेविरोधात या तिन्ही पोलिस कार्यक्षेत्रात गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.