Pune Crime News : फूड इन्स्पेक्टर असल्याचे भासवून हॉटेल मालकाची आर्थिक फसवणूक

एमपीसीन्यूज : पोलीस अधिकारी आणि ‘एफएसएसएआय’चे अधिकारी असल्याचा फोन करून रेस्टॉरंट मालकाला तुमच्या रेस्टॉरंटमधील जेवणामुळे एका मुलीस विषबाधा झाल्याचे सांगत केसमध्ये अडकविण्याची धमकी देउन तिघाजणांनी 4 लाख 76 हजारांना ऑनलाईन गंडा घातला आहे.

ही घटना 21  ते 24  नोव्हेंबरला कॅम्पमधील एका नामांकित रेस्टॉरंटमध्ये घडली. याप्रकरणी नागेश शेट्टी (वय 55, रा. वानवडी ) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागेश यांचे कॅम्प परिसरात रेस्टॉरंट आहे. 21 नोव्हेंबरला त्यांना एकाने फोन करून पोलीस व एफएसएसएआयचे अधिकारी असल्याची बतावणी केली. तुमच्या रेस्टॉरंटमधील जेवण केल्यामुळे एका मुलीला विषबाधा झाली आहे. त्यामुळे तुम्हाला केसमध्ये अडकवितो, अशी धमकी त्यांनी दिली.

केस मिटविण्यासाठी आरोपींनी नागेश यांच्याकडून ऑनलाईनरित्या 4 लाख 76  हजार रूपये घेउन फसवणूक केली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक हरीष शिळीमकर तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.