Pune Crime News : आधी बलात्कार केला, नंतर भावनेच्या भरात चूक झाल्याचे सांगत लग्नाला नकार

एमपीसी न्यूज – शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने एका चाळीस वर्षीय महिलेला लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. नंतर मात्र भावनेच्या भरात चूक झाली असल्याचे सांगितले. आयुष्यभर तुझा सांभाळ करेल पण माझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करू नको, गुन्हा दाखल केल्यास मी आत्महत्या करेन अशी धमकीही त्याने संबंधित महिलेला दिली.

रामदास दत्तोबा थोरात (रा. आयुधिक कार्यशाळा शिवाजीनगर पोलीस मुख्यालय) याच्यावर गुन्हा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 40 वर्षीय महिलेने याप्रकरणी तक्रार दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पीडित महिला आणि आरोपी एकाच ठिकाणी कामाला असल्यामुळे त्यांची ओळख झाली होती. याच ओळखीचा फायदा घेऊन आरोपीने पीडित महिलेला लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्या सोबत शरीर संबंध ठेवले. त्यानंतर मात्र भावनेच्या भरात माझी चूक झाली असून लग्न करण्यास नकार दिला. या चुकीच्या बदल्यात तुला घर घेऊन देतो, शिवाय दर महिन्याला पंधरा हजार रुपये देतो, निवृत्तीनंतर पाच हजार रुपये देतो परंतु माझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करू नको असे सांगितले. परंतु जर बलात्काराचा गुन्हा दाखल केला तर तुझ्या नावाने चिठ्ठी लिहून आणि मदत करेल अशी धमकीही त्याने पीडित महिलेला दिली होती..

दरम्यान पीडित महिलेने या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी चौकशी करून गुन्हा दाखल केला आहे. शिवाजीनगर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.