Pune Crime News : विवाहितेच्या छळ प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – विवाहितेच्या छळ प्रकरणी पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 28 जुलै 2014 ते 6 सप्टेंबर 2021 या कालावधीत सिद्धार्थनगर, धानोरी येथे घडला.

पती राहुल प्रकाश भालेराव, प्रकाश भास्कर भालेराव, शोभा प्रकाश भालेराव, इशांत रघुवंशी, सनी बिवाल (सर्व रा. विश्रांतवाडी, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत 29 वर्षीय विवाहितेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी विवाहितेला लग्न झाल्यापासून पैशांसाठी वेळोवेळी शिवीगाळ करून मारहाण केली. फिर्यादीच्या मुलीला आरोपींनी जाणीवपूर्वक दूर ठेवले. पतीचे मित्र इशांत व सनी या दोघांनी फिर्यादीला शिवीगाळ करून फिर्यादीच्या एक वर्षाच्या मुलीला मारून टाकण्याची धमकी दिली. फिर्यादीचा मित्र शंतनू याला देखील आरोपींनी मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. विश्रांतवाडी पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.