Pune Crime News : सरपंचपद मिळवण्यासाठी गावात हत्यारासह फिरणाऱ्या पाच जणांना अटक

आरोपींमध्ये सराईत गुन्हेगारांचा समावेश ; मोठा शस्त्रसाठा जप्त

एमपीसीन्यूज : सरपंचपद मिळवण्यासाठी पुणे जिल्ह्यातील मांडवी बुद्रुक गावात टोळीसह धुमाकूळ घालणाऱ्या सराईत गुंडाला उत्तमनगर पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्या ताब्यातून 8 कोयते, सतूर, 4 लोखंडी बांबू, लोखंडी रॉड, चार आलिशान गाड्या असा 71 लाख 75 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.

पोलिसांनी यावेळी मोकाच्या गुन्ह्यातील जामीनावर सुटलेला सराईत गुन्हेगार तुषार गोगावले याच्यासह विशाल कोतवाल, विजय पोळेकर, हृषीकेश पाटील आणि चेतन कांबळे यांना अटक केली आहे. उत्तमनगर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील मांडवी बुद्रुक गावात सोमवारी ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल पार पडला. गावात आरोपी तुषार गोगावले याने स्वतःच्या तीन जागा बिनविरोध निवडून आणल्या. आता सरपंच पद मिळवण्यासाठी तो गुंडांच्या टोळीतसह घातक शस्त्र घेऊन गावात आला होता.

दरम्यान, या बाबत माहिती मिळाल्यानंतर उत्तम नगर पोलिसांनी मांडवी खुर्द गावाजवळ आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला. त्यानंतर चार आलिशान गाड्या मधून येणारा आरोपींचा ताफा त्यांनी अडवला. पोलिसांना पाहून आठ आरोपी पळून गेले, तर अन्य आरोपींना आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले.

पोलिसांनी अटक केलेले आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यातील दोघांविरोधात खून, खुनाचा प्रयत्न, आर्म ॲक्ट व मोक्का कायद्याप्रमाणे वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.