Pune Crime News : खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना अटक

एमपीसीन्यूज : माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यावर चतु:शृंगी पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

तर जाधव यांच्यासोबत असलेली महिला ईशा बालाकांत झा (वय 37) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अमन अजय चड्डा (वय 28) यांनी फिर्याद दिली आहे.

सोमवारी सकाळच्या सुमारास फिर्यादी यांचे आई-वडील दुचाकीवरुन जात असताना जाधव चालवीत असलेल्या गाडीचा दरवाजा अचानकपणे उघडला गेला. यामध्ये फिर्यादीच्या आई-वडील खाली पडले आणि त्यांना दुखापत झाली.

याचा जाब विचारल्याने जाधव आणि त्यांच्या महिला सहकार्याने संगनमताने फिर्यादीच्या आई-वडिलांना बेदम मारहाण केली. येथून ब्रेमन चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा अपघात घडला.

हर्षवर्धन जाधव यांनी फिर्यादी यांच्या आई-वडिलांना पोटामध्ये आणि छातीमध्ये लाथा मारल्या. फिर्यादी यांच्या वडिलांचे हार्ट चे ऑपरेशन झाले आहे असे केल्यानंतरही जाधव यांनी त्यांना मारहाण करत खुनाचा प्रयत्न केला. त्यानंतर अमन चड्डा यांनी पोलिस स्टेशन गाठले याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी या प्रकरणी हर्षवर्धन जाधव यांना अटक केली आहे या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दहिफळे करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.